पीकविमा फक्त १ रुपयातच भरा | 1 rs pik vima yojana update

1 rs pik vima yojana update

 राज्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सर्वसमावेशक पिक विमा योजना अर्थात एक रुपयांमध्ये पिक विमा योजना राबवली जात आहे 

 ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना अगदी सहज एक रुपयांमध्ये पॉलिसी उपलब्ध करून दिली जात आहे शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये अर्ज करण्याची मुभा देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी ज्या CSC धारकाच्या माध्यमातून हा अर्ज भरून घेतले जातील त्यांना प्रतीक पॉलिसी ४० रुपयाचा कमिशन देखील शासनाच्या माध्यमातून दिला जात आहे.

 परंतु CSC केंद्रावरती पॉलिसी भरत असताना शेतकऱ्यांना शंभर ते दोनशे रुपयाचा खर्च करावा लागत आहे एक रुपयापेक्षा जास्त पैशाची मागणी सीएससी केंद्रावरती केली जात आहे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी या प्रशासनाला  प्राप्त झालेले आहेत आणि याचेच कृषी विभागाच्या माध्यमातून गंभीर दखल घेऊन याच्या संदर्भातील काही महत्त्वाचे निर्देश देण्यात आलेले आहेत 

 पिक विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी एक रुपया प्रति अर्ज याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही शुल्क सीएससी केंद्रामध्ये भरू नये आणि अशा प्रकारे जर शेतकऱ्यांकडून एक रुपयापेक्षा जास्त रकमेची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी याची तक्रार दाखल करावी अशा प्रकारचा आव्हान कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले आणि याच्यासाठी काही व्हाट्सअप नंबर टोल फ्री नंबर मेल आयडी अशा प्रकारचे नंबर देण्यात आलेले आहेत   

जर CSC केंद्रा मध्ये तुमच्याकडून 1 रुपया पीक विमा फॉर्म भरताना 1 रुपया पेक्षा जास्त पैश्यान्ची मागणी केल्यास खाली दिलेल्या नंबर वर तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता 

टोलफ्री नंबर : 14411 / 18001800417

तक्रार नोंदणी क्रमांक : 022-414581933 / 022-414581934

व्हाट्सअप क्रमांक : 9082921948

ई-मेल id : support@csc.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *