अंगणवाडी मदतनीस भरती, नवीन अर्ज सुरू | Sangli Anganvadi bharti 2024

अंगणवाडी मदतनीस भरती, नवीन अर्ज सुरू | Anganvadi bharti 2024

Sangli Anganvadi Bharti 2024 : मित्रांनो, अंगणवाडी मदतनीस पदभरतीच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा अपडेट आजच्या आर्टिकलमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आज देखील सांगली जिल्ह्यातील रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस पदभरतीच्या संदर्भातील हे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सांगली जिल्ह्यातील रिक्त जागा

सांगली जिल्ह्यातील एकूण रिक्त असलेल्या 30 जागांची ही पदभरती काढण्यात आलेली आहे, ज्यामध्ये अंगणवाडी मदतनीस या पदाची पदभरती असणार आहे. मानधन असणारे 5500 रुपये आणि मिनी सेविकासाठी हे मानधन असणारे 7200 रुपये आहे. यामध्ये 28 जागा अंगणवाडी मदतनीस तर दोन जागा मिनी सेविकाच्या असणार आहेत.

Anganvadi Bharti शैक्षणिक पात्रता

अंगणवाडी मदतनीस पदासाठी शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण असणार आहे. उमेदवार सांगली जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्राअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगली यांच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असावा अशी अट आहे. उमेदवाराला वयाची अट 18 वर्ष ते कमाल 35 वर्ष असून विधवा उमेदवारांसाठी ही वयाची मर्यादा 45 वर्षापर्यंत राहणार आहे.

आवश्यक अटी

लहान कुटुंबामध्ये लहान कुटुंबाची अट लागू राहील. उमेदवारास दोन पेक्षा जास्त आपत्त्या नसावीत. अर्जासोबत परिशिष्ट ब अर्थात लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे देखील जोडणं आवश्यक असणार आहे. भाषेच्या ज्ञानामध्ये दहावी किंवा दहावी पेक्षा जास्त शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषासह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. उमेदवार जर विधवा अनाथ उमेदवार असेल तर उमेदवाराने सक्षम अधिकारी साक्षांकित प्रमाणपत्राची प्रत सोबत जोडावी लागणार आहे.

स्थानिक रहिवासी

अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे आणि स्थानिक रहिवासी असावा अशी अट असल्यामुळे या पदांमध्ये कुठल्याही प्रकारचे बदलीचे प्रावधान राहणार नाही किंवा प्रवास भत्ता देखील दिला जाणार नाही. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग, विभाग जाती, भटक्या जमाती, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग या उमेदवारांना सक्षम अधिकारी साक्षांकित प्रमाणपत्राची प्रत सोबत जोडावी लागणार आहे.

Anganvadi Bharti अर्ज प्रक्रिया

शासकीय यंत्रणे मधील अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याच्या साक्षांकित प्रमाणपत्राची प्रत सोबत जोडावी लागणार आहे आणि अशी प्रत जर जोडली असा अनुभव जर असेल तर प्राधान्य दिलं जातं. यासाठी 22 डिसेंबर 2023 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर उमेदवाराला 8 जानेवारी 2024 सायंकाळी सहा वाजता 15 मिनिटापर्यंत हे अर्ज या ठिकाणी करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, जिल्हा सांगली, पुष्पराज चौक सांगली, मिरज रोड, जिल्हा परिषद दुसरा मजला सांगली या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे.

पात्र उमेदवारांची निवड

या भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या अटीशक्तीचे पालन करणाऱ्या पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. मित्रांनो, रिक्त असलेल्या जागा आपण या ठिकाणी पाहू शकता:

 • शिवानुभाऊ मंडप, जत
 • रामराव नगर, जत
 • खंडीमाळा, जत
 • हनुमान मंदिर, जत
 • सुनेत्रा कॉलनी, जत
 • लक्ष्मी गार्डन, जत
 • डोंगरे गल्ली, खानापूर
 • नवीन वसात, खानापूर
 • जांभळमळा, खानापूर
 • समाज मंदिर, कवटे महाकाळ
 • मसोबा देवालय, कवटे महाकाळ
 • अंबिका देवालय, कवटे महाकाळ
 • बनगर वस्ती, कवटे महाकाळ
 • नरगोल वस्ती, कवटे महाकाळ
 • विद्यानगर, कवटे महाकाळ
 • माळेवाडी
 • माळी तेली वस्ती, कवटे महाकाळ
 • भारती नगर
 • शिवाजीनगर
 • पद्मानगर
 • गोंदिलवाडी, पळूस
 • इंदिरानगर झोपडपट्टी, तासगाव
 • पेटकर प्लॉट, तासगाव
 • तहसीलदार परिसर, कडेगाव
 • मिनी सेविका, माळी नगर एक, कडेगाव
 • मिनी सेविका, नगर पंचायत पाठीमागे
 • शिवाजी चौक महादेव मंदिर, तडसर रोड
 • प्राध्यापक कॉलनी, शिराळा

अर्ज नमुना

मित्रांनो, या पदभरतीसाठी एक विहित नमुन्यातील अर्ज सादर करायचा आहे, ज्याचा नमुना देखील आपण या ठिकाणी पाहू शकता. यामध्ये अर्जदाराचा फोटो, स्वाक्षरी, अर्जदाराची पूर्ण माहिती, शैक्षणिक माहिती, त्याच्या वयाबद्दलची माहिती, जातीमध्ये असेल तर त्याबद्दलची माहिती, उमेदवार विवाहित आहे का अविवाहित आहे ही सर्व माहिती जोडायची आहे. हा विहित नमुन्यातील अर्ज आणि लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अशा कागदपत्रांसह हा अर्ज 8 जानेवारी 2024 पूर्वी दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे.

उपसंहार

मित्रांनो, अशाप्रकारे सांगली जिल्ह्यातील रिक्त असलेल्या या अंगणवाडी मदतनीस पदभरतीच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं अपडेट होतं, ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *