सायकल वाटप अनुदान, अर्ज सुरू 2024 | Cycle Anudan yojana Maharashtra Cycle scheme for students

सायकल वाटप अनुदान, अर्ज सुरू 2024 | Cycle Anudan yojana Maharashtra Cycle scheme for students

Cycle Anudan yojana Maharashtra ,cycle scheme for students : मित्रांनो, इयत्ता पाचवी ते नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या सायकल अनुदान योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आजच्या या आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जिल्हा परिषदेच्या CS योजना अंतर्गत (Cycle scheme)

मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या CS योजना अंतर्गत राज्यामध्ये 20% मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय पाचवी ते नववीमध्ये शिकणाऱ्या मुलामुलींना सायकल अनुदानासाठी जास्तीत जास्त पाच हजार रुपयांचा अनुदान दिले जातात. आणि याच्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी अर्ज मागवल्या जातात.

हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी अर्ज

हिंगोली जिल्ह्यामधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवण्याकरता अर्ज मागविण्यात आलेले आहेत. पाचवी ते नववीमध्ये शिकणारा मागासवर्गीय विद्यार्थी ज्याच्या घरापासून शाळेचा अंतर 2 km असेल, अशा विद्यार्थ्यांना सायकल खरेदी करतात, जास्तीत जास्त पाच हजार रुपयांचा अनुदान दिले जातात. आणि याच्यासाठी अर्ज करण्याचा आव्हान करण्यात आलेला आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी पात्र झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला सर्वात प्रथम सायकल खरेदी करावे लागेल. आणि सायकल खरेदी केल्यानंतर अनुदानासाठी मूळ देत आणि सायकल खरेदी केल्याबाबत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र हा प्रस्ताव समाज कल्याण अधिकारी अथवा गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना सादर करावा लागणार आहे.

अनुदान जमा प्रक्रिया

हा प्रस्ताव सादर केल्यावर पाच हजार रुपयांचा अनुदान त्या विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. याच्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या अर्ज गटविकास अधिकारी अथवा जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद हिंगोली या ठिकाणी 19 जुलै 2024 पूर्वी सादर करावेत.

आधीचे अर्ज आणि सूचना

ज्या विद्यार्थ्यांनी सन 2023-24 मध्ये अर्ज सादर केलेला होता, कागदपत्रांच्या छाननीत पात्र ठरले होते, परंतु त्यांची निवड झाली नाही, अशा विद्यार्थ्यांना परत अर्ज करण्याची गरज नाही. विलंबान प्राप्त होणारे अर्जाचा विचार केला जाणार नाही. अशा प्रकारची सूचना सुद्धा देण्यात आलेली आहे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी 19 जुलै 2024 पूर्वी आपले अर्ज पंचायत समितीच्या माध्यमातून सादर करावे, असे प्रकारचा अहवाल करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *