गोदाम अनुदान योजना 12 लाख 50 हजार रुपये अनुदान | Godam scheme Maharashtra

गोदाम अनुदान योजना 12 लाख 50 हजार रुपये अनुदान | Godam scheme Maharashtra

Godam scheme Maharashtra : मित्रांनो, गोदाम अनुदान योजना शासनाच्या माध्यमातून गोडाऊन उभारणी करता 12 लाख 50 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जात आहे. 2020-25 आर्थिक वर्षाकरिता या योजने करता अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. मित्रांनो, याच अनुषंगाने अर्ज कोणाला करता येणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरता येणार, नेमका अनुदान किती दिला जातो, योजना कशा प्रकारे राबवली जाते या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या या आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान

मित्रांनो, देशांतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान राबवले जात आहे. त्यामध्ये तेल बिया, खाद्यतेल असे वेगवेगळ्या मार्गांचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. याच्याच अंतर्गत आपण जर पाहिलं तर कडधान्य असतील, अन्नधान्य असतील, तेल बियाणे असतील, या सर्वांची साठवणूक करता यावी यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होऊ नये यासाठी या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या अंतर्गत अडीचशे टन कॅपॅसिटी पर्यंतच्या गोडाऊन उभारणीसाठी मंजुरी दिली जात आहे.

हे पण बघा :

प्रकल्प खर्च आणि अनुदान

प्रकल्प खर्च 25 लाख गृहीत धरून जास्तीत जास्त 50% किंवा 12 लाख 50 हजार यापैकी रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाते. मित्रांनो, याच्यासाठी 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता प्रत्येक जिल्ह्याला निश्चित करून या योजने करता अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये कडधान्याचा समावेश आहे, काही जिल्ह्यांमध्ये इतर काही धन्यांचा समावेश आहे.

अर्ज प्रक्रिया

या जिल्ह्यामधील शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी उत्पादक संस्थांच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात येतील. तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत एक अर्ज प्रस्ताव सादर करायचा असतो. जर प्रमाणाच्या पेक्षा जास्त अर्ज आले तर त्याचे लॉटरी पद्धतीने निवड केली जाते. जर दोनच अर्ज आले आणि दोन्ही पात्र असतील तर त्या दोन्ही अर्जांना या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जातो.

अर्जाची अंतिम तारीख

31 जुलै 2024 पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले आहेत. आपण जर या योजनेच्या अंतर्गत अनुदानासाठी गोडाऊन योजनेसाठी इच्छुक असाल आणि अटी-शर्तींमध्ये पात्र असाल, तर आपल्या तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या योजनेसाठी अर्ज करू शकता.

तर मित्रांनो, या योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील ही एक महत्वाची माहिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *