राज्यात मुसळधार पावसाचा इशारा | Hawaman andaz maharashtra

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा | Hawaman andaz maharashtra

Hawaman andaz maharashtra : दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा एकदा राज्यामध्ये सक्रिय झालेला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. हवामान विभागाचा अलर्ट हवामान विभागाच्या माध्यमातून काही जिल्ह्यासाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसाच्या हवामानाच्या अंदाजाविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करणारे आहोत.

  • कोकण विभागातील पाऊस

कोकण विभागामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्याचा काही भाग या ठिकाणी येत्या दोन दिवसांसाठी (24 आणि 25 जून) जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

  • मध्य महाराष्ट्रातील पाऊस

मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे, नाशिक, साताऱ्याचा काही भाग या ठिकाणी अतिशय जोरदार पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत.

  • मराठवाडा आणि इतर भागातील पाऊस

23 जून रोजी कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी मेघ गर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सोलापूर, सांगली, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे.

काही भागांतील मुसळधार पाऊस

जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडासह मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यामध्ये 23 जूनला विजेच्या कडकडासह अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

  • पुणे आणि मुंबईतील पाऊस

पुणे, मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

  • इतर जिल्ह्यांतील पाऊस

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये 23 जूनला तुरळक ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. 24 जून रोजी जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडासह मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

पुढील आठवड्यातील पाऊस

धुळे, नाशिक, नंदुरबार, पालघर, पुणे, मुंबई, ठाणे या भागांमध्ये 24 जून रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या भागांमध्ये 24 आणि 25 जूनला तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाच्या शक्यता आहेत.

मान्सूनची पुढील स्थिती

प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मान्सून राज्यामध्ये सक्रिय झाला आहे. पुढील महिनाभर म्हणजे पुढील चार आठवडे पावसाचा जोर राज्यामध्ये राहील अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. नवीन अपडेट येत राहतील ते आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *