Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Maharashtra

Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Maharashtra

Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Maharashtra : मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजने अंतर्गत आता महिला व मुलींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. आता तुम्ही म्हणाल यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत, कोण अर्ज करू शकतो, तर सविस्तर थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगतो.

आत्ता जो काही अर्थसंकल्प 2024-25 चा सादर झालेला आहे, यामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. तर यासाठी थोडक्यात माहिती आपण या लेखात जाणून घेऊयात.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mazi Bahin Ladki Yojana )

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.

लागणारी डोकमेंट्सVIEW
  • आर्थिक सहाय्य

या योजने अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार प्रत्येक महिन्याला 1500 रुपये.

हे पण वाचा :

पात्रता

  • ज्या महिलांचे वय कमीत कमी 21 पाहिजे आणि जास्तीत जास्त 60.
  • 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, आणि निराधार महिला.
  • सगळ्यात महत्त्वाचं, या महिलेंचं कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचे आहे, तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळेल.

अर्ज प्रक्रिया

अर्ज अजून सुरू झालेले नाहीत. महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडम यांनी ही माहिती दिलेली आहे आणि तसेच अर्थसंकल्पामध्ये सुद्धा ही घोषणा करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *