पशू केसीसी कर्जाचे नवीन दर निश्चित | Pashu kcc loan rates 2024

Pashu kcc loan rates 2024

Pashu kcc loan rates 2024 च्या खरीप हंगामासाठी दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत. ज्याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे की कोणत्या पिकासाठी नेमकं किती पीक कर्ज दिलं जाणार आहे.

पीक कर्जाचे दर

मित्रांनो, या निश्चित केलेल्या दरासोबत मधुमक्षिका पालन, मत्स्यपालन, गाई, म्हशी, शेळी, मेंढी इत्यादीसाठी सुद्धा किती कर्ज दिलं जावं याच्यासाठीचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत. या सर्वाच्या संदर्भातील माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ड्रॅगन फ्रूट साठी कर्जाचे दर

मित्रांनो, याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूट साठी सुद्धा दर निश्चित करण्यात आलेले आहेत. बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रूट साठी प्रति हेक्टरी किती कर्ज दिलं जाईल याच्याबद्दल विचारणा केली होतेय. मित्रांनो, ड्रॅगन फ्रूट साठी प्रति हेक्टर ₹180000 रुपये एवढं पीक कर्ज देण्यासाठी निश्चित करण्यात आलेलं आहे.

हे पण बघा :

विविध पिकांसाठी कर्ज

यासाठी गाईसाठी ₹30 हजार रुपये, याचप्रमाणे म्हशीसाठी 37000 प्रति युनिट, याचप्रमाणे शेळी मेंढी पालन करण्यासाठी सुद्धा ₹35000 प्रति युनिट. याच बरोबर मत्स्यपालन करण्यासाठी आपण जर पाहिलं तर जे शेतकरी स्वतःच्या शेततळ्यामध्ये मत्स्यपालन करतात अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरच्या शेततळ्यासाठी पाच लाख रुपया पर्यंत कर्ज आता बँकांच्या माध्यमातून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

पशु केसीसी अंतर्गत कर्ज (Pashu kcc loan)

मित्रांनो, हे जे काही कर्ज आहेत हे पशु केसीसीच्या अंतर्गत दिली जातात. त्याच्यामुळे या पशु केसीसीच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या या कर्जाचा देखील बँकर समितीच्या माध्यमातून या निश्चित केलेल्या दरामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. याचप्रमाणे बरेच सारे शेतकरी किंवा मत्स्यपालक तळ्यामध्ये नदीमध्ये मत्स्यपालन करतात. त्यांच्यासाठी सुद्धा 30000 पासून 80000 रुपया पर्यंत कर्ज देण्यासाठी निश्चित करण्यात आलेला आहे. मधुमक्षिका पालन दहा पेट्यासाठी 76180 रुपये एवढं कर्ज दिलं जाणार आहे.

विविध पिकांच्या कर्जाचे दर

मित्रांनो, याच बरोबर याच्यामध्ये उसाचे सुद्धा दर आपण पाहिले होते. उसाच्या दरामध्ये, ज्वारीच्या दरामध्ये थोडी वाढ करण्यात आलेली होती. ज्वारीसाठी जे पीक कर्ज दिलं जात होतं ते आता 28600 रुपये प्रति हेक्टर एवढं दिलं जाणार आहे. टिशू कल्चर उसासाठी हेक्टरी ₹15000, याचप्रमाणे अडसालीसाठी ₹132700 रुपये तर पूर्व हंगामी आणि सुरू उसासाठी ₹125000 रुपये एवढं पीक कर्ज दिलं जाणार आहे. लसूण, हळद, आलं, संक्रीट, टोमॅटो इत्यादीच्या दरामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे.

धानासाठी कर्ज

मित्रांनो, याच बरोबर धानासाठी 21100 रुपये प्रति एकर असं पीक कर्ज दिलं जात होतं. याच्यामध्ये ₹2000 वाढ करून आता धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी 23100 रुपये प्रति एकर या प्रमाणामध्ये हे पीक कर्ज दिलं जाणार आहे.

निष्कर्ष

तर मित्रांनो, अशाप्रकारे ही पीक कर्ज दिली जाणार आहेत. पशुंसाठी पशु खरेदी करण्यासाठी जी कर्ज दिली जाणार आहेत ज्याच्याबद्दलची माहिती आपण या आर्टिकल च्या माध्यमातून घेतलेली आहे. इतर पिकांच्या संदर्भात यापूर्वीच आपण माहिती घेतलेली आहे ज्याच्यामध्ये सोयाबीन साठी जर पीक कर्ज कमी करण्यात आलंय किंवा इतर पिकांचे काही दर स्थिर ठेवण्यात आलेले आहेत.

मित्रांनो, अशाप्रकारे पीक कर्जाच्या संदर्भातील आणि या पशूंच्या कर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *