Tractor subsidy योजना | PM Kisan Tractor Yojana Subsidy 2024 Maharashtra

Tractor subsidy योजना | PM Kisan Tractor Yojana Subsidy 2024 Maharashtra

Tractor subsidy योजना | PM Kisan Tractor Yojana Subsidy 2024 Maharashtra : मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी आणि मोठ्या प्रमाणात मागणी असलेली योजना म्हणजे कृषी यंत्रीकरण योजना आहे. याच योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर 4 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. याच्याच बद्दलची सविस्तर माहिती आजच्या आर्टिकलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मित्रांनो, राज्यामध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कृषी यंत्रीकरणाकडे कल आहे. शेती आधुनिक पद्धतीने केली जात आहे आणि याच पार्श्वभूमीवरती केंद्र शासनाच्या माध्यमातून अनुदान तत्वावरती हे कृषी अवजार खरेदी करता यावेत यासाठी कृषी यांत्रीकरण उप अभियान राबवलं जातं.

राज्य पुरस्कृत कृषी यंत्रीकरण योजना

मात्र, राज्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात यांत्रीकरणाकडे कल असल्यामुळे राज्यातील लाभार्थी जे शेतकरी आहेत, इच्छुकांची संख्या जास्त आहे. याच्यामुळे केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनेमध्ये सर्व शेतकरी पात्र होत नाहीत. अशा शेतकऱ्यांना या यंत्र अवजाराच्या अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य पुरस्कृत कृषी यंत्रीकरण योजना राबवली जाते.

2024-25 आर्थिक वर्षातील योजना

याच योजनेला 2024-25 मध्ये राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, 2024-25 या आर्थिक वर्षांमध्ये ही योजना राबवण्याकरता 250 कोटी रुपयांची तरतूद ह्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली असून, या 250 कोटी रुपयांपैकी 60% निधीचा वापर करून ही योजना 2024-25 मध्ये राबवण्याकरता 150 कोटी रुपयांच्या निधीसह ही योजना राबवायला प्रशासकीय मान्यता ही 4 जुलैच्या 2024 च्या शासन निर्णयानुसार देण्यात आलेली आहे.

अनुदानाचा दर

परंतु, मित्रांनो, ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देत असताना दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा जो दर आहे, तो मात्र कायम ठेवण्यात आलेला आहे. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतले की ऑक्टोबर 2023 पासून केंद्र शासनाच्या माध्यमातून जे काही कृषी यंत्रीकरणाच्या अंतर्गत अवजार आहे, ट्रॅक्टर आहे, याच्या दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यासंदर्भातील निर्देश देण्यात आलेले होते.

हे पण बघा :

ट्रॅक्टरसाठी अनुदान ( Tractor Anudan Yojana )

डिसेंबर 2023 मध्ये सुद्धा सर्व राज्य शासनाला याच्या संदर्भातील पत्र देण्यात आलेली होती. याच पार्श्वभूमवरती राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा ट्रॅक्टरसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करून पाच लाख रुपया पर्यंत अनुदान मर्यादा करण्यासाठी मंजुरी दिलेली होती. परंतु महाडीबीटी वरती अवजाराच्या या अनुदानाची परिगणना वगैरे सारे बदल करणं आवश्यक असल्यामुळे हे अनुदान अद्याप 5 लाखापर्यंत करण्यात आलेलं नव्हतं.

अनुदानाचा बदल

तर जो काही परिपत्रक जीआर काढण्यात आलेला होता, तो मागे घेण्यात आलेला होता. आणि आता 1 एप्रिल 2024 पासून हे पाच लाख रुपयांचा अनुदान लागू होईल अशा प्रकारे शेतकऱ्यांना या ठिकाणी अपेक्षा होती. परंतु मित्रांनो, हा जीआर निर्गमित करत असताना जे दिलं जाणार अनुदान आहे, ते मात्र अनुसूचित जाती जमाती आणि अल्पभूद्रक शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच 50% किंवा जास्तीत जास्त सव्वा लाख या मर्यादेमध्ये देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले आहे.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी अनुदान

सर्वसाधारण प्रवर्ग बहुबोधक शेतकरी जे असतील, यांना 40% किंवा जास्तीत जास्त 1 लाख याच प्रमाणामध्ये देण्यासाठी या जीआरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी होणारा उशीर कारण आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये इच्छुक शेतकरी जास्त आहेत, अर्ज केले जातात, अर्ज लवकर पात्र होत नाहीत कारण इच्छुक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.

अनुदानाची अंमलबजावणी

अर्ज केल्यानंतर लवकर पूर्वसंमती मिळत नाही आणि पूर्वसंमती मिळाल्यानंतर यंत्र अवजार खरेदी केल्यानंतर निधीची उपलब्ध नसल्यामुळे अनुदानाचं वाटप होत नाही. शेतकरी जास्त पात्र न करता प्रत्येक वर्षी अनुदान हे स्पिल ओवर म्हणजे तरतूद केलेला निधी सुद्धा पुढे पुढे ढकलला जातोय. अशा परिस्थितीमध्ये 250 कोटी रुपयांची तरतूद, यापैकी 150 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता आणि याच्यामध्ये अनुदान दिलं जाणार कमी याच्यामुळे शेतकऱ्यांचा या योजनेकडे आता थोडासा कल कमी होताना दिसत आहे.

केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे अनुदान

केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे लवकरात लवकर राज्य शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अशा योजना राबवल्या जात असताना दिल्या जाणाऱ्या ज्या अनुदानाचे गणना आहे, ते वाढवण्यात यावी. केंद्र शासनाचा नवीन अनुदानाचा जो निकष आहे, दर आहे, तो लागू करून या योजना राबवाव्यात अशीच एक अपेक्षा आहे.

जुन्या अनुदानाच्या दरानुसार योजना

तर मित्रांनो, तुरतास तरी जुन्याच अनुदानाच्या दरानुसार 4 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य पुरस्कृत कृषी यांत्रीकरण योजना ही राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा जीआर आपण maharashtra.gov.in या संकेत स्थळावरती पाहू शकता।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *