PM kisan योजना नवीन नोंदणी, कोण पात्र, हप्ता येणार का, घ्या जाणून सविस्तर 2024

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना : मित्रांनो, राज्यासह देशातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन देणारी एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. याच योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये मानधन दिलं जातं. अशाप्रकारे, शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये मानधन या दोन्ही योजनांच्या माध्यमातून दिलं जात आहे.

नोंदणी समस्यांबद्दल

परंतु, या योजनेच्या अंतर्गत नवीन नोंदणी केलेल्या बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांची नोंदणी अद्याप देखील मंजूर करण्यात आलेली नाही. बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना यापूर्वी हप्ते येत होते, परंतु त्या शेतकऱ्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. काही शेतकऱ्यांना हप्ते येत आहेत किंवा काही शेतकऱ्यांना अद्यापही या योजनेच्या अंतर्गत हप्ते आलेले नाहीत.

नवीन नोंदणीचे नियम

बऱ्याच साऱ्या जणांना याच्या अंतर्गत नवीन नोंदणी करायची आहे. तर या नवीन नोंदणीच्या संदर्भातील काय नियम आहेत, हप्ते येत होते परंतु हप्ते येण्याचे बंद झाले याची काय कारण असू शकतात. सध्या जर हप्ते येत असतील आणि हे पुढे हप्ते येतील का, किंवा न येण्याची काय कारण असू शकतात हे देखील आज सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे. 2020 मध्ये याच्यामध्ये नवीन अमेंडमेंट आणण्यात आल्या आणि पूर्वी अल्प-भूद्रक शेतकऱ्यांसाठी असलेली योजना सर्व शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे.

पात्रता आणि लाभ

याच्यामध्ये फेब्रुवारी 2019 पूर्वी जे काही फेरफार झालेले आहेत, ते सर्व पात्र करण्यात आलेले आहेत. याच्या अंतर्गत एका कुटुंबातील एक व्यक्ती ज्या रेशन कार्ड वरती आहे अशा कुटुंबातील एका लाभार्थ्याला या योजनेच्या अंतर्गत लाभ देण्यासाठी पात्र करण्यात आलेला आहे.

अपात्र लाभार्थी

माजी मंत्री, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरकारी कर्मचारी (चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून), पेन्शन धारक ज्याचे पेन्शन 25 हजारा पेक्षा जास्त आहे, इन्कम टॅक्स भरणारे असे लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत अपात्र धरले जातात.

नवीन नोंदणी प्रक्रियेबद्दल

  • पात्रता आणि नियम

नवीन नोंदणी करण्यासाठी फेब्रुवारी 2019 पूर्वीचा फेरफार असेल आणि लाभार्थी म्हणून नोंदणी केलेली नसेल तर तुम्ही नोंदणी करू शकता. फेब्रुवारी 2019 नंतर मयत पावलेला लाभार्थी असेल तर त्याचे वारस, विभक्त कुटुंब असल्यास नवीन नोंदणी करू शकतात.

  • वारसा हक्क

वारसा हक्काने जमीन आलेली असल्यास, नवीन नोंदणी करण्याची परवानगी आहे. फेब्रुवारी 2024 पर्यंत लॉक इन पिरियड होता, त्यामुळे नवीन गाईडलाईन्स निवडणुकीनंतर येतील.

लाभ मिळण्यासाठी आवश्यक तपासणी

  • फिजिकल व्हेरिफिकेशन

लाभार्थ्याच्या फिजिकल व्हेरिफिकेशनची प्रक्रिया कृषी विभागाच्या माध्यमातून केली जाते.

  • केवायसी आणि आधार लिंकिंग

केवायसी पूर्ण झालेल्या लाभार्थ्याला हप्ते सुरळीत येतात. केवायसी न झालेल्या लाभार्थ्याला हप्त्यापासून वगळण्यात येते. बँकेला आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे.

डीबीटी माध्यमातून अनुदान वितरण

  • डीबीटी प्रणाली

डीबीटीच्या माध्यमातून आधार संलग्न बँक खात्यामध्ये पैसे टाकले जातात. बँकेला आधार कार्ड लिंक करणं, केवायसी पूर्ण करणं, फिजिकल व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे.

निष्कर्ष

  • नोंदणी आणि लाभांची प्रक्रिया

नवीन नोंदणी करत असताना 2019 नंतरचा वारसाचा फेरफार असल्यास, दोघांपैकी एकाच लाभार्थ्याला अर्ज करता येतो. प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे, रेशन कार्ड नंबर आवश्यक आहे.

जर तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कमेंट करा, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *