शबरी आवास घरकुल योजना | Shabari awas Gharkul Yojana 2024

शबरी आवास घरकुल योजना | Shabari awas Gharkul Yojana 2024

Shabari awas gharkul yojana शबरी आवास घरकुल योजना : मित्रांनो, आदिवासी उपयोजना अंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी शबरी आवास घरकुल योजना आणि याच योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्यात अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी योजना म्हणजे शबरी आवास घरकुल योजना आहे. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना दिला जात होता. परंतु, 2023 मध्ये बदल करून शहरी भागासाठी सुद्धा योजना राबवायला मंजुरी देण्यात आलेली आहे.

  • शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी अनुदान

शहरी भागातील अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांचा अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच योजनेला नवीन आर्थिक लक्ष देण्यात आले आहे.

हे पण वाचा : सरसकट शेतकरी कर्जमाफी साठी अभियान

  • नवीन अर्जांची मागणी

2024-25 आर्थिक वर्षाकरिता नवीन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. राज्यांमध्ये पंधरा वर्षांपेक्षा जास्त रहिवास असलेले अनुसूचित जमातीचे नागरिक या योजनेच्या अंतर्गत अर्ज करू शकतात.

  • अर्जदाराच्या वयाची अट

अर्जदाराचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावं अशी अट आहे. अठरा वर्षे वरील लाभार्थी, ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, ते या योजनेच्या अंतर्गत अर्ज करू शकतात.

  • कौटुंबिक आर्थिक उत्पन्नाची अट

शहरी भागातील लाभार्थ्यांच्या कौटुंबिक आर्थिक उत्पन्नाचे प्रमाण तीन लाख रुपये पेक्षा जास्त नसावं. यासाठी उत्पन्नाचा दाखला देखील द्यावा लागणार आहे.

लाभार्थ्याकडे स्वतःचं घर नसावं अशी अट आहे. अशा प्रकारचे लाभार्थी शहरी भागासाठी या योजनेचा अर्ज करू शकतात.

  • अर्ज सादर करण्याची प्रक्रिया

शहरी भागातील लाभार्थ्यांनी आपल्या भागातील आदिवासी विकास एकात्मिक प्रकल्प कार्यालयात नमुन्यातील अर्ज सादर करायचे आहेत.

अनुदान वितरण

Shabari awas Gharkul Yojana या योजनेच्या अंतर्गत घरकुलासाठी अडीच लाख रुपयांचा अनुदान दिलं जाणार आहे. चार हप्त्यांमध्ये या अनुदानाचा वितरण करण्यासाठी जीआरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *