सरसकट शेतकरी कर्जमाफी साठी 1 जुलैपासून अभियान | 1 july KarjMafi Abhiya

नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित शेतकऱ्यांची कर्जमाफी गरजेची

1 july KarjMafi Abhiya वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती अभियान : गेल्या काही वर्षापासून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे गरजेचे आहे. वीज बिल माफी होणे गरजेचे आहे. शेतकऱ्याला पीक विमा मिळणे देखील तेवढेच गरजेचे आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर शासनाने मानसिकता बदलून या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे.

विरोधी पक्षाची भूमिका

मित्रांनो, याच्यासाठी विरोधी पक्षाच्या माध्यमातून आवाज उठवणे देखील तेवढंच गरजेचे आहे. या सर्वाच्या गडबडीमध्ये आता स्वाभिमानी शेतकरी संघटना सुद्धा कर्जमाफी व वीज बिल माफीसाठी आक्रमक झालेली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलेलं आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी 15 ठराव संमत करण्यात आलेले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एक जुलै पासून राज्यस्तरीय एक अभियान सुरू करण्यात आलेले आहे.

वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती अभियान

Vasantrao Naik KarMafi Abhiyan या अभियानाला “वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती अभियान” असे नाव देण्यात आले असून, हे अभियान राज्यभर राबवलं जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांची संपूर्ण वीज बिल माफी, सोयाबीन व इतर पेंड यांच्या आयातीवर 40% आयात शुल्क लावणे, कांद्याच्या निर्यातीवर शून्य टक्के दर लावणे, गाईच्या दुधाला सात रुपयाचे अनुदान देणे अशा मागण्या आहेत.

शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची हमी

शेतकऱ्यांची मुलं शाळेत शिकत असताना, उच्च शिक्षण घेत असताना त्याच्या शिक्षणाची कर्ज शासनाने घ्यावी. शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज उपलब्ध करून द्यावीत. शेतीमधील कृषी कनेक्शनला वीज मीटर लावू नयेत अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

ऊसाचे वजन काटे डिजिटल करणे

कारखान्यामधील ऊसाचे वजन काटे डिजिटल करावेत, संगणकीकृत करावेत अशा मागण्या सुद्धा या संघटनेच्या माध्यमातून केली जाणार आहेत.

रासायनिक खतांचे खर्च

रासायनिक खतांचे खर्च व भाव कमी करणे, अवजार खरेदीवर जीएसटी परतावा मिळावा अशा विविध मागण्यांसह 1 जुलै पासून हे अभियान राज्यभर राबवलं जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रत्येक स्तरावरून पावलं उचलणं, समर्थन करणं गरजेचे आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हे अभियान सुरू करण्यात आले आहे. विरोधी पक्षाच्या माध्यमातून देखील ही मागणी मोठ्या प्रमाणात लावून धरावी. शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे, जेणेकरून शासनावर परिणाम होऊन येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये किंवा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय घेतले जाऊ शकतील. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *