मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना : 90 % अनुदान | MINI Tractor Yojana Maharashtra

मिनी ट्रॅक्टर योजना  MINI Tractor Yojana अंतर्गत कशा पद्धतीने तुम्हाला शासकीय अनुदान मिळते किती मिळते आणि अर्ज कोठे करावा लागतो या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.

या योजनेच्या माध्यमातून MINI Tractor वर ९०% (३.५० लाखापर्यंत अनुदान मिळणार ) ते कसे मिळणार व कोणाला मिळणार जणून घेरण्यासाठी पोस्ट पूर्ण वाचा हि पोस्ट खूप उपयोगी येणार आहे . 

sjsa.maharashtra.gov.in या गव्हर्मेंट वेबसाईट वरून मिळालेल्या माहितीनुसार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यात येणार आहे.ही जी MINI Tractor Yojana आहे ती महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिली जाते या संदर्भातील माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेलि आहे.

शेती मध्ये ट्रॅक्टर चा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे .  नांगरणी असते किंवा  पेरणी सर्व कामे आता ट्रॅक्टर द्वारा केली जातात.  शेतीमध्ये बरीच कामे ट्रॅक्‍टरने केली जात असली तरी आंतरमशागतीसाठी मात्र ट्रॅक्टरला काही मर्यादा येतात अशावेळी तुमच्याकडे मिनी ट्रॅक्टर असेल तर शेती मशागतीची कामे जलद गतीने होतात मोठ्या ट्रॅक्टर पेक्षा मिनी ट्रॅक्टर ची साईज लहान असल्याने पावसाळ्यात देखील अंतर पिकांमध्ये या मिनी ट्रॅक्टर द्वारे  मशागत करणे सोपे होते या मिनि ट्रॅक्टर ने कामे जरी सोपी होत असली तरीही मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी पैसा नसतो . अश्या वेळी शासकीय अनुदानाचा लाभ घेऊन तुम्ही तुमचे मिनी ट्रॅक्टर खरेदी करू शकतात.

MINI Tractor Yojana 90% अनुदान

जर तुम्ही या योजने मध्ये बसत असाल तर तुम्हाला शासनाकडून मिनी ट्रॅक्टर वर ९०% अनुदान मिळेल .

MINI Tractor Yojana कोणत्या जिल्ह्यां मध्ये मिळणार

सर्वात आधी आपण बघू हि MINI Tractor Yojana कोणत्या जिल्ह्यां मध्ये मिळणार आहे मी खाली लिस्ट दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्यां चे नाव आहे का ते बघा जर असेल तर तुम्ही योजनेचा फायदा घेऊशकता .

 • अकोला
 • अमरावती
 • बुलडाणा
 • वाशिम
 • यवतमाळ
 • औरंगाबाद
 • बीड
 • जालना

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या प्रमुख अटी | Terms of Mini Tractor Subsidy Scheme

या योजनेचा लाभघेण्याआधी शासनाच्या काही प्रमुख अटी तर ते आपण जाणून येऊया.

 • स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत.
 • अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत.
 • मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु. 3.50 लाख इतकी राहील, स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या 10% स्वहिस्सा भरल्यानंतर 90% (कमाल रु. 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल.

मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी कोण पात्र असेल |योजनेचा उद्देश

अनुसूचित जाती व नवबौद्ध साठी स्वताचे काहीतरी उत्पनाचे साधन निर्माण व्हावे व रोजगाराचे साधने वाढावे हाच सरकारचा उद्देश आहे

या योजने चा लाभ अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लोक अर्ज करूशकतील

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यांची पध्दत

संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालयाकडे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य अर्ज करु शकतील.

मला संपूर्ण माहित कोठे भेटेल

सर्वप्रथम तुम्हाला या गव्हर्मेंट वेबसाइट ला व्हिजिट करायचे आहेस . त्यानुनंतर तुम्हाला खाली दिलेल्या स्क्रीनशॉट सारखे पेज ओपन होईल .

MINI Tractor Yojana Maharashtra

त्या नंतर उजव्या साइड ला ३ लाईन दिसतील तेथे क्लिक करावे पुढे तुम्हाला योजना नावाने एक बटन दिसेल तेथे क्लिक करावे पुढे तुम्हाला आर्थिक उन्नतीसाठी असेल बटन दिसेल तेथे क्लिक तेथे तुम्हाला समोरच दिसेल अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणेबाबत

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना : 90 % अनुदान | MINI Tractor Yojana Maharashtra

किंवा तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डायरेक्ट त्या पेज वर जाऊशकता

CLICK HERE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *