Sinchan Vihir Anudan Yojana 2022 ,Dr.babasaheb ambedkar vihir yojana ,100% अनुदानावर सिंचन विहीर योजना,किती अनुदान मिळणार ,कोणाला मिळणार ,फॉम कुठे भरायचा .
Dr.babasaheb ambedkar vihir yojana कोणते लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतील ? कोणत्या कॅटेगिरी साठी सर्वप्रथम प्राधान्य दिले जाणार आहे ? त्यानंतर कोणत्या ठिकाणी अर्ज करणे सुरुवात होणार आहेत ? याची संपूर्ण माहिती या पोस्ट च्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे .
मित्रांनो जर तुम्ही शेतकरी असाल तर हि पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो तुमच्या शेतामध्ये जर एखादा सिंचनाचा घटक उपलब्ध नसेल विहीर, शेत तळ, सौर ऊर्जा पंप, किंवा या व्यतिरिक्त जे काही सिंचन उपलब्ध नाहीये त्यामुळे तुमच्या शेतातून जे निघणार उत्पन्न आहे ते चांगल्या पद्धतीनं होत नाही . यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू करण्यात आली .

हे पण बघा : मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना : 90 % अनुदान
नाव | डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना |
मुख्य लाभार्थी | अनुसूचित जाती आणि जमाती |
लाभ | 50 हजार ते 2.5 लाख |
वेबसाइट | https://mahadbtmahait.gov.in/ |
टोलफ्री हेल्पलाइन नंबर | – |
हे पण बघा : अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना यादी
Sinchan Vihir Anudan Yojana 2022 किती अनुदान मिळणार
या योजनेच्या माध्यमातून नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपये शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहेत आणि जुनी विहीर जर तुमच्या शेतामध्ये असेल तर त्यावेळी तुम्हाला विहीर दुरुस्ती करायची असेल तर 50 हजार रुपये पर्यंत अनुदान शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहे .
सिंचन विहीर योजनेसाठी कोण लाभार्थी असणार
कोणत्या लाभार्थ्यांना हे अनुदान दिले जाणार आहे या गोष्टींची माहिती तुम्हाला असणं गरजेचे आहे. अर्ज भरणे महाडीबीटी(MAHADBT) पोर्टल वरती सुरुवात झालेले आहेत .Dr.babasaheb ambedkar vihir yojana या योजनेसाठी अनुसूचित जाती आणि जमातीतील लाभार्थ्यांना सर्वप्रथम प्राधान्य दिले गेलेला आहे.
Dr.babasaheb ambedkar vihir yojana अर्ज कोठे करायचा
जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आता कोणत्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज करू शकता हे बघू मित्रांनो घरी बसल्या सुद्धा तुम्ही महाडीबीटी पोर्टल वरून अर्ज करू शकतात परंतु अनेक लाभार्थी youtube वर व्हिडिओ बघून मोबाईल वरून प्रयत्न करत आहेत त्यामुळे काही लाभार्थ्यांचे अर्ज यशस्वीरीत्या पूर्ण होत आहेत तर काही लोकांला अर्ज भरतानि त्रुटी येत आहे . तुम्हाला अर्जदार भरता येत असेल तरच महाडीबीटी पोर्टल वरती घरी बसल्या अर्ज भरा अन्यथा अर्ज घरी घरी भरू नये . किंवा आपले सरकार सेवा केंद्रा मध्ये भरू शकता या योजनेचा परिपूर्ण लाभ घ्या .
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत नवीन विहीर जुनी विहीर दुरुस्ती, शेत तळ त्यानंतर सौर ऊर्जा पंप असेल किंवा या व्यतिरिक्त अनेक सिंचनासाठी उपलब्ध करून देणारे घटक आहेत या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील घटकासाठी हे अनुदान दिले जाईल . जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही नक्की अर्ज करा आणि तुमच्या शेतीमध्ये एक सिंचनाचा घटक उपलब्ध करून घ्या .
सिंचन विहीर योजनेसाठी पात्रता
- लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
- लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
- जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
- लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
- उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
- लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.
- एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील ५ वर्षे त्याच लाभार्थ्यास किंवा कुटुंबास या योजनेचा लाभ देय नाही.
जर तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
तर अश्या पद्धतीने आपण सिंचन विहीर योजना,Mahadbt Vihir yojna Maharashtra ,या बद्दल माहिती जणून घेतली जर तुमच्या मनात काही शंका असेल तर आम्हाला कंमेंट मध्ये कळवा . धन्यवाद !
Leave a Reply