MahaDBT शेती योजनेची लॉटरी लागली | MahaDBT farmer scheme Lottery (Yojana)

MahaDBT शेती योजनेची लॉटरी लागली | MahaDBT farmer scheme Lottery (Yojana)

MahaDBT farmer scheme शेती योजनेची लॉटरी लागली आहे आणि याच्या यासंदर्भातील सविस्तर माहिती अपडेट या पोस्ट च्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत .

शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या सर्व योजना एक शेतकरी एक अर्ज योजना अनेक अर्थात MahaDBT farmer scheme च्या पोर्टल वर राबवल्या जातात आणि या पोर्टल वर अनुदानासाठी अर्ज केलेल्या आणि आपली निवड होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक असे अपडेट आहे .

या महाडीबीटी पोर्टल वरती कृषी यांत्रिकीकरण ज्यामध्ये ट्रॅक्टर , ट्रॅक्टरचे अवजार असतील त्याच बरोबर आपल्या शेतामधील ठिबक सिंचन, तुषार सिंचन पाईप किंवा इतर काही गोष्टी असतील अशा सर्व प्रकारच्या बाबीं करता अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे आणि अशा निवड झालेल्या शेतकऱ्यांना मेसेज येण्यास सुरू झाले आहेत .

हे पण बघा : अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना यादी

मित्रांनो बऱ्याचवेळा तांत्रिक कारणामुळे मेसेज मिळत नाही आपली जर निवड झालेले असेल आणि काही कारणास्तव मेसेज आलेला नसेल तर आपलं नुकसान पण होऊ शकतं .

जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर आपल्या युजर आयडी पासवर्ड ने आपल्या आधार आणि OTP सह लॉगिन करून आपली त्यामध्ये मध्ये निवड झाली आहे का ते चेक करू शकता.

कारण आता नवीन नियमानुसार आपण जर पाहिले तर Mahadbt स्कीमची लॉटरी लागल्यानंतर पात्र झालेल्या लाभार्थ्यांना सात दिवसांमध्ये कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितले जातात सात दिवसांची मुदत संपल्यानंतर कागदपत्र जर अपलोड केले नाही तर त्या लाभार्थ्याला पुढे तीन दिवसांची मुदत दिली जाते आणि या कालावधीमध्ये जर आपण कागदपत्र अपलोड केली नाही तर या कारना मुळे आपला अर्ज बाद केला जातो .

त्यामुळे तुमची निवड झालेली असून सुद्धा तुम्हाला मेसेज न मिळाल्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकत त्यामुळे आपल्या एसएमएस आलाय का चेक करा आणि आपल्याला जर एसएमएस आलेला नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा चेक करू शकता .

त्यासाठी तुम्हाला https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाईट वर जायचे आहे किंवा तुम्ही गुगल मध्ये mahadbt farmer scheme असे सर्च करून पण जाऊ शकता या वेबसाईट वर आल्या नंतर तुमचा user Id आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे जर तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड करून सुद्धा लॉगिन करू शकता .

तुम्ही लॉग इन केल्या नंतर तुमची निवड झालेली असेल तर तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी मेसेज दाखवला जाईल की तुमची या घटकासाठी निवड झालेली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *