Soyabean Crop Insurance | सोयाबीनचा पिक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरु

Soyabean Crop Insurance | सोयाबीनचा पिक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरु

Soyabin Pik Vima Yojana : नमस्कार शेतकरी बांधवानो , सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. शेतकरी मित्रांनो आपल्याला तर माहितीच की मागील काही काळामध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते. त्यासाठी पिक विमा नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सरकारने दिला होता. जिल्ह्यातील २४ मंडळातील सोयाबीन उत्पादक विमाधारक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिक विमा भरला अशा शेतकऱ्यांना 25% टक्के पिक विमा मिळण्यास सुरुवात देखील झालेली आहे. या न्यूज च्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती आपण पाहूया.

शेतकरी मित्रांनो जरी तुमच्या पिकाचा पंचनामा झालेला नसेल तरी तुम्हाला 25 % टक्के पिक विमा रक्कम मिळणार आहे.असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे.आणि ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने पिक विमा भरला होता.अशा शेतकऱ्यांना पिक विमा लवकरच जमा होणार आहे.

जिल्ह्यातील २४ मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी १४ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या अधिसूचनेत काही महत्त्वाच्या बाबींचा उहापोद करण्यात आला आहे. त्यानुसार 25% रक्कम ही पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात एका महिन्याच्या आत रक्कम जमा करण्यात येणार आहे . वरील दिलेली सदरील रक्कम ही शेवटी नुकसान भरपाईतून समायाेजित करण्यात येणार आहे, अस सुद्धा या अधिसूचनेत स्पष्टीकरण देण्यात आलय.

आता आपण शासन निर्णय काय आहेत ते बघुया

शासन निर्णय : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य ” या योजनेंतर्गत रुपये १०० प्रति क्विंटल प्रमाणे मंजूर प्रलंबित सोयाबीन अनुदान थेट पणन परवानाधारक / खाजगी बाजार समित्यांना अदा करण्यास सन २०२२ च्या दुसऱ्या ( पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेली रक्कम रुपये १,६१,५१,७८२ सदर शासन निर्णयान्वये उपलब्ध करुन देत आहे .

सर्व माहिती जाणून घेण्यासाठी PDF डाउनलोड करा

Download PDF

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *